तोंडवळी ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद पाटील यांची निवड

सरपंच नेहा तोंडवळकर आणि उपसरपंच हर्षद पाटील यांनी स्वीकारला पदभार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील तोंडवळी ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आली आहे. गुरुवारी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत उपसरपंच पदी ठाकरे गटाच्या हर्षद दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली. यानंतर सरपंच सौ. नेहा निलेश तोंडवळकर आणि उपसरपंच हर्षद पाटील यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी माजी सरपंच आबा कांदळकर, दशरथ वायंगणकर, सदानंद पाटील, गणेश तोंडवळकर, कल्पेश नाईक, दीपक कांदळकर, दिलीप पुजारे, मंगेश नाईक, आशिष पाटील, मंगेश चव्हाण, अमित पाटील, निलेश तोंडवळकर, सचिन बागवे, प्रमोद पाटील यांच्यासह ग्रा. पं. सदस्य नरेंद्र दत्तात्रय मेस्त, सौ.हर्षदा हर्षद केळुसकर, कु. हर्षद दिलीप यांनी, सौ. स्नेहल संतोष पाटील, सौ. अनन्या अमित पाटील, सौ. मानसी महेश चव्हाण, सौ. सुजाता संदीप पाटील, ज्ञानेश भिकाजी गोलतकर आदी नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!