असरोंडी ग्रा. पं. वर परिवर्तन ; तब्बल २० वर्षांनी भगवा फडकला

उपसरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाचे बाळकृष्ण (आदित्य) सावंत बिनविरोध

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रा. पं. सदस्यांनी गावातील जेष्ठ मंडळी, तरुण वर्ग, महिला भगिनींच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार

मालवण | कुणाल मांजरेकर

ग्रामपंचायत निवडणुकीत मालवण तालुक्यातील असरोंडी ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले आहे. ग्रा. पं. मधील विद्यमान सत्ताधाऱ्यांना मतदारांनी पराभवाचा धक्का देत या ग्रा. पं. वर तब्बल २० वर्षांनी भगवा फडकवला आहे. या ग्रा. पं. मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरपंच पदासह ६ जागा मिळवल्या. तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या ग्रा. पं. च्या उपसरपंच पदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या बाळकृष्ण (आदित्य) सावंत यांची बिनाविरोध निवड झाली आहे. दरम्यान, असरोंडी गावच्या इतिहासात प्रथमच गावातील सर्व जेष्ठ मंडळी, तरुण वर्ग, महिला भगिनी यांना विजयी उमेदवार आणि शिवसेना पदाधिकारी यांनी निमंत्रित करून सर्व मंडळींचा सत्कार केला. या सर्वांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच अनंत पोईपकर, उपसरपंच आदित्य सावंत आणि सदस्य यांनी पदभार स्वीकारला.

असरोंडी ग्रामपंचायतीवर राणे समर्थकांचे वर्चस्व होते. मात्र यंदाच्या ग्रा. पं. निवडणुकीत याठिकाणी परिवर्तन झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार अनंत पोईपकर यांनी भाजपचे उमेदवार विलास मेस्त्री यांचा पराभव केला. तर ग्रा. पं. मध्ये बाळकृष्ण सावंत, अजय गावडे, संदीप सावंत, आर्या परब, संगीता सावंत, श्रावणी सावंत हे ठाकरे गटाचे सहा सदस्य निवडून आले असून भाजपच्या आरती आजगावकर या एकमेव सदस्य ग्रा. पं. वर गेल्या आहेत. या ग्रा. पं. च्या उपसरपंच पदाची निवडणूक गुरुवारी झाली. यावेळी उपसरपंच पदी आदित्य सावंत यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सर्व सदस्य, ग्रामसेवक सौ. घाडी, माजी सरपंच दिलीप घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (भाऊ सावंत ), पोलीस पाटील लवू सावंत, शाखा प्रमुख सुनील सावंत, प्रकाश सावंत, अनंत सावंत, मोहन परब, अनिल सावंत, प्रदिप सावंत, मोहन सावंत, संदीप सावंत, सत्यविजय परब, राजू परब, बबलू परब, दीपक माने, अंकुश सावंत व अन्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!