राजेश (राजू) अशोक सावंत यांची घुमडे ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड
सरपंच स्नेहल बिरमोळे, उपसरपंच राजू सावंत यांनी स्वीकारला पदभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील घुमडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राजेश (राजू) अशोक सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच स्नेहल बिरमोळे आणि उपसरपंच राजू सावंत यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. राजू सावंत यांनी ग्रा. पं. च्या मागील कालावधीत अडीच वर्षे उपसरपंच पद सांभाळले आहे.
घुमडे ग्रामपंचायत बिनविरोध भाजपच्या ताब्यात आली आहे. या ग्रा. पं. च्या सरपंच पदी स्नेहल बिरमोळे यांची बिनबिरोध निवड झाली. गुरुवारी याठिकाणी उपसरपंच निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी राजेश उर्फ राजू अशोक सावंत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. राजू सावंत हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. मागील कालावधीत ग्रा. पं. सदस्य म्हणून काम केले असून यामध्ये अडीच वर्षे उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
गुरुवारी ही निवड झाल्यानंतर नूतन सरपंच आणि उपसरपंचांनी पदभार स्वीकारला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, अशोक सावंत यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य चंदा वस्त, योगिता जाधव, सुगंधी बिरमोळे, प्रीती बिरमोळे, योगेश सामंत, सुभराव राणे, ग्रामसेवक हर्षदा मसुरकर यांच्यासह माजी सरपंच दिलीप बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, विष्णु बिरमोळे, सुधीर वस्त, उमेश परब, सुनील टेंबुलकर, आरती राणे, राजू पवार आदी उपस्थित होते.