कोळंब ग्रा. पं. च्या उपसरपंच पदी शिवसेना ठाकरे गटाचे विजय नेमळेकर बिनविरोध
नूतन सरपंच सिया धुरी, उपसरपंच नेमळेकर यांनी स्वीकारला पदभार
मालवण | कुणाल मांजरेकर
प्रतिष्ठेच्या कोळंब ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकहाती सत्ता आलेल्या कोळंब ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज बिनविरोध झाली. यावेळी उपसरपंच म्हणून ज्येष्ठ नेते विजय नेमळेकर यांची वर्णी लागली आहे. नूतन सरपंच सिया धुरी आणि उपसरपंच विजय नेमळेकर यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.
भाजपच्या ताब्यातील कोळंब ग्रामपंचायत यंदा तब्बल ३० वर्षानंतर शिवसेना ठाकरे गटाने एकहाती आणली आहे. सरपंच पदी शिवसेनेच्या सिया धुरी यांनी विजय मिळवला. तर ग्रा. पं. च्या ६ पैकी ३ जागांवर शिवसेना ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. याठिकाणी गुरुवारी उपसरपंच निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ नेते विजय नेमळेकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन सरपंच आणि उपसरपंच यांनी यावेळी पदभार स्वीकारला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. शिल्पा खोत, अवी नेरकर, संजना शेलटकर, निकिता बागवे, संपदा प्रभू, नंदा बावकर, स्वप्नील परब, संदीप शेलटकर, बाबा नेमळेकर, गजा पै, राजू साळकर, आबू पराडकर, बबलू कांदळगावकर, गुंड्या शेलटकर, निखिल नेमळेकर, राजू धुरी, अरुण ढोलम, रामचंद्र धुरी, दिलीप नेमळेकर, बापू बावकर आदिंसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.