सुकळवाड ग्रा. पं. उपसरपंचपदी भाजपचे विशाल वाळके बिनविरोध !

मालवण : मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपच्या विशाल वाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रा. पं. चे नूतन सरपंच युवराज गरुड आणि उपसरपंच विशाल वाळके यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. या ठिकाणी संख्याबळ नसल्याने विरोधकांनी निवडणुकीत अलिप्त राहणे पसंत केले.

दरम्यान भाजपचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे प्रकाश पावसकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, प्रसाद मोरजकर, माजी सभापती माधुरी बांदेकर, माजी उपसरपंच स्वप्नील गावडे, सागर कुशे, किशोर पेडणेकर, बाबुराव मसुरकर, सुभाष टेंबुलकर, वैदेही मोरजकर, सिद्धेश पावसकर, विलास मसुरकर, जान्हवी पालकर, जनार्दन पेडणेकर, अविनाश गरुड, सुभाष म्हसकर आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!