चौके ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी पी. के. चौकेकर बिनविरोध !

सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरपंच पी.के. चौकेकर यांनी स्वीकारला पदभार

मालवण | कुणाल मांजरेकर

चौके ग्रामपंचायतीवर सत्ता परिवर्तन होऊन सरपंचपदी गाव पॅनलच्या गोपाळ चौकेकर हे निवडून आल्यानंतर आज झालेल्या उपसरपंच निवडणुकीत गाव पॅनलच्या पी. के. चौकेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर नूतन सरपंच आणि उपसरपंचांनी पदभार स्वीकारला.

चौके ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून थेट सरपंच म्हणून चौके गावविकास आघाडीचे गोपाळ सहदेव चौकेकर (गोपाळमामा) निवडून आले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि चौके गावविकास आघाडी यांच्यात लढत झाली होती. भाजपचे माजी सरपंच राजा गावडे यांच्यासह ५ सदस्य निवडून आले. तर चौके गावविकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार आणि ४ सदस्य निवडून आले होते. नवीन नियमावलीनुसार सरपंच यांना २ मते देण्याचा अधिकार मिळाल्याने चौके गावविकास आघाडीला उपसरपंच पदासाठी बहुमत झाल्याने पी. के. चौकेकर यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला होता. या पदासाठी अन्य कोणाचा अर्ज दाखल न केल्यामुळे पी. के. चौकेकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीसाठी निवडणूक अधिकारी दत्तात्रय भाऊसो कांबळे व प्रभारी ग्रामसेवक श्रीमती शुभदा रामचंद्र कोठावळे उपस्थित होते. त्यांनी सरपंच, उपसरपंच यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी नुतन ग्रा. प. सदस्य दुलाजी चौकेकर, शिवदास मांजरेकर, सौ.विशाखा चौकेकर, सौ.सुचिता पोळ, सौ अक्षता गायकवाड, सौ.जयश्री चौकेकर, सौ आनंदी चौकेकर उपस्थित होते. संजय गावडे, बिजेंद्र गावडे, अजित पार्टे, मंदार गावडे, संतोष गावडे, महेश सावंत, शिवप्रसाद चौकेकर, विष्णू चौकेकर, नंदू राणे, नाना देसाई, विलास आंबेरकर, गणेश चौकेकर, हेमंत गावडे, उमाकांत गावडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!