वायरी भूतनाथ ग्रा. पं. चे नूतन सरपंच, सदस्य खा. विनायक राऊतांच्या भेटीला !

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या लढतीत विजय मिळवलेल्या सरपंच भगवान लुडबे आणि ग्रा. पं. सदस्यांनी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत यांची त्यांच्या तळगाव निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राऊत यांनी या सर्वांचे अभिनंदन करीत भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीत शिवसेना पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार भगवान लुडबे यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी यश मिळवले आहे. या सर्वांनी आज खा. विनायक राऊत यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे यांच्यासह विभागप्रमुख प्रवीण लुडबे, शाखाप्रमुख जयवंत लुडबे, बंड्या लुडबे, ग्रा. पं. सदस्य तेजस लुडबे, ज्येष्ठ शिवसैनिक मंगेश कुडाळकर, विश्वास लुडबे, ऋत्विक चव्हाण आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3525

Leave a Reply

error: Content is protected !!