मालवण मधील पहिलं एसी, कमर्शियल रेफ्रिजरेशनचं नवीन दालन ग्राहकांच्या सेवेत !

आर. के. इलेक्ट्रॉनिक्सचा पुढाकार ; पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | कुणाल मांजरेकर

येथील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने शहरातील बांगीवाडा येथील आकार कॉम्प्लेक्समध्ये मालवण मधील पहिलं एसी, कमर्शियल रेफ्रिजरेशनच्या विक्रीचं दालन गुरुवार पासून ग्राहकांच्या सेवेत दाखल झालं आहे. गुरुवारी याचा शुभारंभ झाल्यानंतर हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांनी याठिकाणी खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याठिकाणी खरेदीसाठी सुलभ हप्त्यांवर बजाज फायनान्सची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आर. के. इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा हेमचंद्र कोयंडे यांनी दिली.

मालवण मधील आर. के. इलेक्ट्रॉनिक्सचं नाव आज जिल्ह्यात सर्वदूर पसरलं आहे. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, साउंड सिस्टीम, इन्व्हर्टर यांसह विविध घरगुती उपकरणांच्या खरेदीसाठी ग्राहक आर. के. इलेक्ट्रॉनिक्सला पसंती दर्शवितात. मालवण शहर आणि परिसरात हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिकांना व्यावसायिक डिप फ्रिज, एसी खरेदीसाठी मालवण बाहेर जावे लागत असल्याने शहरातच ही सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आर. के. इलेक्ट्रॉनिक्स ने गुरुवार पासून शहरातील बांगीवाडा येथे एसी, कमर्शियल रेफ्रिजरेशनचं नवीन दालन सुरु केले आहे. याठिकाणी कमर्शिअल कुलिंग प्रॉडक्ट, डीप फ्रीजर, ग्लास डोअर फ्रिज, कॉम्बो फ्रिजर, कनव्हंरटिबेल फ्रिजर, इलेक्ट्रिक वॉटर हिटर, सोलर हिटर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत. तसेच व्यावसायिक ग्राहकांसाठी लागणारे फ्रिज, बॉटल कुलर, ग्लास डोअर कुलर, एसी, कॉम्बो कुलर प्रत्यक्ष पाहून त्यांचे प्रकार पाहून खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गोदरेज, दायकिन, आय एफ बी, ब्लू स्टार, बी पी एल, बॉश, हायर, वेस्टर्न, लॉईड कंपनीचे एसी, फ्रिजर, व्हि- गार्ड, ओरिएंट, हिंडवेअर कंपनीचे वॉटर हिटर, व्हि- गार्ड कंपनीचे स्टेबीलायझर येथे उपलब्ध असून त्वरित फायनान्सची उपलब्ध देखील देण्यात येणार आहे. गुरुवारी याचा शुभारंभ झाल्यानंतर व्यावसायिक ग्राहकांनी खरेदीसाठी येथे गर्दी केली होती. याठिकाणी विक्री आणि दुरुस्तीची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी अधिक माहितीसाठी आर के इलेक्ट्रॉनिक्स, मालवण आकार संकुल, बांगिवाडा 9405930011, 9860056456 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!