सुदेश आचरेकर बागुलबुवा करीत असलेला हायमास्ट टॉवर आ. वैभव नाईकांच्या माध्यमातूनच …

शिवसेना ठाकरे गटाचा पलटवार ; हायमास्ट टॉवरची साधी वायर बदलण्यासाठी आचरेकरांवर नारळ फोडण्याची वेळ

मालवण | कुणाल मांजरेकर

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर बागुलबुवा करीत असलेला दांडी आवार येथील हायमास्ट टॉवर आम्हा शिवसेना नगरसेवकांच्या पाठपूराव्याने आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे. सुदेश आचरेकर २५ वर्ष नगरसेवक आहेत. त्यातील १५ वर्ष ते नगराध्यक्ष होते, पण जेथून मालवणचे अर्थकारण चालते, त्या दांडी आवार याठिकाणी हायमास्ट टॉवर त्यांना उभारता आला नाही, अशी टीका युवा सेनेच्या तपस्वी मयेकर, सन्मेश परब आणि पंकज साध्ये यांनी केली आहे. दांडी विभागात शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची आचरेकर यांनी धास्ती घेतली आहे, म्हणूनच साधी वायर बदलण्याच्या कामाचा नारळ फोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, अशी टीका त्यांनी केली.

दांडी आवार येथील हायमास्ट टॉवर सुरु करण्याच्या विषया वरून मालवण शहरात श्रेय वाद रंगला आहे. या कामाचे श्रेय घेणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी लोकप्रतिनिधींवर भाजपा नेते सुदेश आचरेकर यांनी टीका केल्यानंतर ठाकरे गटाने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. आचरेकर यांच्या भागातील बेवडा बिल्डिंग ते काळबादेवी सुरेश प्रभू गल्ली हा रस्ता त्या भागातील नागरिकांनी आमदार वैभव नाईक यांच्या जवळ बैठक लावून मागणी केली आणि ती आता मागणी पूर्ण झाली त्यामुळे आचरेकर साहेब हतबल झाले आहेत. हे काम उद्या होणार असे आचरेकर याना फिरून नागरिकांना सांगावे लागले. त्यामुळे सध्या आचरेकर सैरभैर झाले आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण शहरात आणलेली विकासकामे अडवणे आणि आपण आल्याशिवाय नारळ फोडू नये अशी ठेकेदारांना धमकी देणे हा एक कलमी कार्यक्रम सध्या आचरेकर यांच्याकडे राहिला आहे.

आज राज्यात सत्ताबदल होऊन सहा महिने झाले. केंद्रात तीन वर्ष मंत्रीपद आहे. या माध्यमातून मालवण शहरासाठी किती निधी आचरेकर यांनी खेचुन आणला ते जाहीर करावे. सत्तेसाठी हपापलेल्या आचरेकर याना आता जनता ओळखून आहे. याही निवडणुकीत त्यांना जनता जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही, असेही तपस्वी मयेकर, सन्मेष परब, पंकज साध्ये यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!