चिवला बीचकडे जाणाऱ्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणास सुरुवात…
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या प्रयत्नांतून काम मार्गी
मालवण : मालवण शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या चिवला बीचकडे जाणाऱ्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामास बुधवारपासून सुरवात करण्यात आली. आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या प्रयत्नांतून हे काम मार्गी लागले आहे.
चिवला बीचकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी, पर्यटन व्यावसायिकांची होती. त्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधी माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
नगरोत्थान योजनेतंर्गत सुमारे २६ लाख रुपये खर्चाच्या या कामास मंजुरी मिळाली. या रस्त्याच्या कामास सुरवात करण्यात आली. यावेळी माजी बांधकाम सभापती यतीन खोत, रुजाय फर्नांडिस, रुपेश कांबळी, मनोज शिरोडकर, गणेश चव्हाण, मिथुन धुरी, दीपा शिंदे, साक्षी मयेकर, संतोष परब, शांती तोंडवळकर यांच्यासह पालिकेचे अभियंता राजा केरीपाळे अन्य कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. हे काम मार्गी लागल्याने स्थानिक रहिवाशी, पर्यटन व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामाच्या पूर्ततेबाबत पालिका प्रशासनाचे यतीन खोत यांनी आभार मानले आहेत.