मालवणात यंदाचा ख्रिसमस होणार “खास” ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाकडून तब्बल तीन स्पर्धा !

गोठे सजावट स्पर्धा, चांदणी बनवणे स्पर्धा याबरोबरच कॅरल सिंगिंग स्पर्धेचे आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणात ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला ख्रिसमस सण यंदा खास होणार आहे. ख्रिसमस निमित्ताने युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच मालवण शहर मर्यादित गोठे सजावट स्पर्धा तसेच चांदणी बनवणे (स्टार) स्पर्धा या बरोबरच कॅरल सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने अलीकडेच हिंदू धर्मीयांसाठी तुळशी सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. नाविन्यपूर्ण स्पर्धा घेण्यात माहीर असलेल्या सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाने आता ख्रिस्ती धर्मियांचा महत्वपूर्ण सण मानला जाणारा ख्रिसमस (नाताळ) सणाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहर मर्यादित गोठे सजावट स्पर्धा तसेच चांदणी बनविणे (स्टार) स्पर्धा त्याचप्रमाणे कॅरल सिंगिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गोठे सजावट स्पर्धेतील प्रथम विजेत्या स्पर्धकास ३,३३३ रुपयाचे पारितोषिक तर द्वितीय विजेत्या स्पर्धकास २,२२२ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तर चांदणी बनविणे स्पर्धेतील प्रथम विजेत्यास २२२२ रुपयाचे पारितोषिक आणि द्वितीय विजेत्यास ११११ रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे. वैशिष्टपूर्ण अशा कॅरल सिंगिंग स्पर्धेतील विजेत्यास ५५५५ रुपये तर द्वितीय विजेत्यास ३३३३ रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र, स्पर्धेसाठी प्रथम ३५ आलेल्या स्पर्धकांच्या नावांचाच प्राधान्याने विचार केला जाणार आहे. या तीनही स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपली नावे दिनांक २५ डिसेंबर पर्यंत निषय पालेकर मो. ९९७५५५७१२३ वर संपर्क साधून द्यावीत असे आवाहन सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाने केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!