ग्रा. पं. निकालात भाजपा मालवण तालुक्यात ठरणार “नंबर वन”
भाजपा नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास ; पोईप विभागात उमेदवार, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी
मालवण : ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी सोमवारी पोईप विभागाला भेट दिली. यावेळी ग्रा. पं. उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत निवडणुकी बाबत मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यात सर्वाधिक बिनविरोध ग्रामपंचायती मालवण तालुक्यातुन आहेत. ग्रामपंचायत निवडणूक निकालातही हेच चित्र कायम राहणार असून भाजपच्या सर्वाधिक ग्रामपंचायती मालवण तालुक्यातूनच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामस्थांचे आशिर्वाद कायम ठेवा. गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.
यावेळी जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती अनिल कांदळकर, भाजप पुरस्कृत
सरपंच पदाचे उमेदवार श्रीधर राघोजी नाईक, सदस्य पदाचे उमेदवार आशिर्वाद बाबू माधव, मनाली महेंद्रनाथ नाईक, सुभदा गोपाळ वर्दम, विष्णू रामचंद्र पालव, सहदेव शंकर वेगुंर्लेकर, संपदा अनिकेत सावंत, महेश धर्माजी पालव, संचिता संतोष पालव, दिपाली अजय जाधव यासह भाजप कार्यकर्ते गाव अध्यक्ष शंकर रावजी पालव, पोईप गावचे भाजपचे उपसरपंच संदीप सावंत, परशुराम नाईक, विलास माधव, महेंद्र पालव, अशोक पालव, अनिकेत सावंत, सुर्यकांत सावंत, सुर्यकांत चव्हाण, नंदू माधव, मनोहर माधव, मिलिंद नाईक, अमेय नाईक, बाबाजी नाईक, संतोष पालव, अस्मित पालव, बाबू परब यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.