सुकळवाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का…
उपशाखाप्रमुख किरण पाताडे, भूषण पाताडे यांचा भाजपमध्ये प्रवेश
मालवण : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील सुकळवाड मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला धक्का बसला आहे. येथील ठाकरे गटाचे उपशाखाप्रमुख किरण पाताडे, भूषण पाताडे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्याने प्रभावित होऊन आपण भाजपात प्रवेश केल्याचे किरण पाताडे आणि भूषण पाताडे यांनी सांगितले. या प्रवेशासाठी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत आणि मालवण पंचायत समितीचे माजी सभापती अजिंक्य पाताडे यांनी प्रयत्न केले. भाजपा युवा नेते बाबा परब, धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पक्षाचे काम करणार असल्याचे किरण पाताडे यांनी म्हटले असून निलेश राणे आमदार व्हावेत यासाठी आपला खारीचा वाटा उचलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.