महानमध्ये ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखासह माजी ग्रा. पं. सदस्याचा भाजपात प्रवेश
आ. वैभव नाईकांसह तालुकाप्रमुखाच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून पक्षत्याग केल्याची माहिती
मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. ठाकरे शिवसेनेच्या महान ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हिमाली शिंदे व शाखाप्रमुख हेमंत शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज भाजपमध्ये प्रवेश केला. येथील भाजपा कार्यालयात भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून आपण पक्षाचा त्याग करत असल्याचे शिंदे दांपत्याने म्हटले आहे. आता भाजपाच्या शाश्वत विकासाच्या रथाचे सारथी बनून महान गावातील ग्रामस्थांची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महिला तालुकाध्यक्षा पूजा करलकर, सुधीर साळसकर, सुदेश आचरेकर, बबलू राऊत, संतोष घाडी, मदन घाडी, अक्षय तावडे, सुहास साळुंखे, मंगेश साळसकर, दिनेश घाडी, अवधूत जाधव, नीता चव्हाण, संदीप शिंदे, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.