मालवण खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी राजन गावकर यांची निवड
उपाध्यक्षपदी पत्रकार कृष्णा ढोलम यांची वर्णी ; भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार
मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी आचरा येथील राजन गावकर तर उपाध्यक्षपदी पत्रकार कृष्णा ढोलम यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. शेतकरी, सभासद यासह ग्राहकांना दर्जेदार सुविधा देताना कामगारांचे हित जोपासत सर्व संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार केला जाईल अशी ग्वाही राजन गावकर आणि कृष्णा ढोलम यांनी दिली.
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पार पडली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पाठविलेल्या नावांचा लखोटा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्याकडे सुपूर्द केला. अशोक सावंत यांनी अध्यक्ष पदासाठी राजन गावकर, उपाध्यक्ष पदासाठी कृष्णा ढोलम यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, रमेश हडकर, सुधीर साळसकर, महेश मांजरेकर, प्रफुल्ल प्रभू, राजन गांवकर, कृष्णा ढोलम, कृष्णा चव्हाण, विजय ढोलम, अमित गावडे, महेश गावकर, सरोज परब, अमृता सावंत, सुरेश चौकेकर, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई, अशोक तोडणकर यासह अन्य उपस्थित होते. अध्यक्ष पदासाठी राजन गावकर आणि उपाध्यक्ष पदासाठी कृष्णा ढोलम यांचा एक एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.
केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांना अपेक्षित असलेले पारदर्शक काम करण्यात येईल. खरेदी विक्री संघाचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन प्रकल्प, संकल्पना, राबविण्यात येतील. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन संघाचा कारभार करण्यात येईल. जनतेला दर्जेदार सेवा देण्यात देण्यात येईल. शेतकरी, ग्राहक यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही अध्यक्ष राजन गावकर, उपाध्यक्ष कृष्णा ढोलम यांनी दिली. भाजपा कार्यालयातही दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, बाबा परब, सुदेश आचरेकर, संतोष कोदे, जेरॉन फर्नांडिस, पूजा करलकर, दीपक पाटकर, राजू बिड्ये, मंदार लुडबे, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.