मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष पदी अमित गावडे

उपाध्यक्षपदी बाळकृष्ण लुडबे, सचिवपदी सुभाष गिरकर तर खजिनदारपदी विजय पेडणेकर यांची निवड

मालवण : मालवण तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांची महत्त्वपूर्ण सभा ओझर या ठिकाणी सोमवारी पार पडली. यावेळी मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटनेच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्षपदाची जबाबदारी रेवंडी सर्जेकोटचे रेशन दुकानदार तथा मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अमित गावडे यांच्याकडे देण्याचे सर्वानुमते निश्चित करत बिनविरोध निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी तारकर्ली देवबागचे रेशन दुकानदार बाळकृष्ण लुडबे, सचिवपदी कट्टा येथील रेशन दुकानदार सुभाष गिरकर तर खजिनदारपदी धुरीवाडा धान्य दुकानदार विजय पेडणेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड रात आली. या सभेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन दुकानदार संघटना सल्लागार कमलाकांत (बाळू) कुबल, अजित भोगले, भाई मांजरेकर, नंदकुमार सावंत, योगेश जाधव, सुरेश बागवे, विलास धुरी, दीपक बागवे, अमित गावडे, बबन परब, दादा मांजरेकर, विशाल ढोलम, प्रशांत मलये, विजय पेडणेकर, सुभाष गिरकर, बाबु लुडबे, द्वारकानाथ पालव, रोहीत पेडणेकर, पोईप सोसायटी चेअरमन विठ्ठल नाईक यांच्यासहित धान्य व केरोसीन दुकानदार उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!