आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा ४ फेब्रुवारीला
मालवण : दक्षिण कोकणची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर झाली आहे.
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. त्यानुसार यंदा जत्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या वर्षी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात. आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागली आहे.