सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट कडून पुन्हा एकदा किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम

ताम्हणकर फिश सेंटर ते हरी खोबरेकर फिश सेंटर पर्यंतचा किनारा केला स्वच्छ ; पुढील रविवारीही राबवणार मोहीम

“आपली किनारपट्टी, आपली जबाबदारी” याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने किनारा स्वच्छतेसाठी गांभीर्य बाळगावे : सौरभ ताम्हणकर यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि युथ बिट्स फॉर क्लायमेटकडून रविवारी पुन्हा एकदा मालवणच्या किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ताम्हणकर फिश सेंटर ते हरी खोबरेकर फिश सेंटर पर्यंतचा किनारा यावेळी स्वच्छ करण्यात आला. पुढील रविवारीही अशी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. आपला किनारा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक स्थानिक नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे “आपली किनारपट्टी, आपली जबाबदारी” याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने किनारा स्वच्छतेसाठी गांभीर्य बाळगावे, असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांनी यावेळी केले.

या स्वच्छता मोहिमेत गौरव कांदळगावकर, पूजा जाधव, मीना घुर्ये, अनुश्री वराडकर, मेगल डीसोझा आदी सहभागी झाले होते. “आपली किनारपट्टी आपली जबाबदारी” नावाने ही किनारपट्टी स्वच्छता मोहीम राबवली जात असून पुढील रविवारी देखील हरी खोबरेकर फिश सेंटरच्या पुढील किनारा स्वच्छ केला जाणार आहे. श्रीकृष्ण ताम्हणकर मित्र मंडळाची ही तिसरी तर युथ बिट्स फॉर क्लायमेटची ५५ वी किनारा स्वच्छता मोहीम आहे. स्थानिक नागरिकांनी देखील स्वतःचा किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!