सुनील घाडीगांवकरांचा श्रावण गवळीवाडी टेंबवाडी मध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का

पदाधिकारी, शिवसैनिकांचा भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मालवण | कुणाल मांजरेकर

माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला श्रावण गवळीवाडी टेंबवाडी मध्ये जोरदार धक्का दिला आहे. येथील ठाकरे गटाचे माजी उपसरपंच प्रमोद गवळी, माजी सरपंच अंकुश लाड, शाखाप्रमुख विजय गवळी यांच्यासह शिवसैनिकांनी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, जि. प. चे माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, बाळू कुबल, श्रावण सरपंच प्रशांत परब, नंदू आंगणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगावकर, प्रमोद घाडी, दीपक घाडी, बबन बर्डे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवेशकर्त्यामध्ये चंद्रसेन लाड, चैताली लाड, सुरेखा पदारे, सूर्यकांत पदारे, सुनीता गवळी, महेश गवळी, मानसी गवळी, संतोष गवळी, संजना गवळी, प्रियांका गवळी, वैभव यादव, चंद्रकांत यादव, सरिता यादव, रेश्मा यादव, अनिता रामाडे, सुनील चौकेकर, सुप्रिया चौकेकर, प्रतिक चौकेकर, विजया गवळी, वसुंधरा गवळी, सुनीता गवळी, लवराज भारमल, लतिका भारमल, सुनीता भारमल, सविता भारमल, जागृती लाड, सुहासिनी गवळी यांचा समावेश आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!