मालवण, कणकवलीत पावसाची एन्ट्री ; अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून अचानक पावसाची सुरुवात झालेली आहे. कणकवली शहराला सोमवारी सायंकाळी पावसाने झोडपून काढले. सावंतवाडी, मालवण मध्येही पावसाने हजेरी लावली.
अचानक सुरु झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. तर आंबा, काजू, इतर पिके घेणारे शेतकरी देखील चिंतेत पडले आहेत.
सिंधुदुर्गात बऱ्यापैकी शेतीची काम देखील सुरू आहेत. तर नुकताच आंबा, काजू पिकाला देखील मोहोर येत असतानाच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील धबधबे देखील कोसळताना दिसून आले. प्राधिकरणाने ओव्हर ब्रिज बरील पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेली पाईपलाईन ही थेट सर्व्हिस रोडवरच सोडलेली असल्याने पावसाळ्यात वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. आता तरी या समस्येकडे प्राधिकरण व ठेकेदार लक्ष देणार का ? असा प्रश्न पुन्हा जोर धरू लागला आहे