सकल भंडारी ज्ञाती बांधवांची रविवारी मालवणात बैठक
वधुवर विवाह नोंदणी, भंडारी चषक क्रिकेट स्पर्धा, वैद्यकीय शिबीर आयोजनावर होणार चर्चा
मालवण | कुणाल मांजरेकर : सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवणच्या वतीने भंडारी ज्ञाती बांधवांची बैठक रविवार दि. २७ नोव्हेबर रोजी सकाळी १०.३० वाजता लिलांजली हॉल भरड मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत वधुवर विवाह नोंदणीच्या शुभारंभाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. तसेच भंडारी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजन आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये वैद्यकिय आरोग्य शिबिर आयोजित करण्या बाबत चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन भंडारी समाजाचे मालवण तालुकाध्यक्ष रवी तळाशीलकर यांनी केले आहे.