आ. नितेश राणेंकडून कळसुली विभागातही पक्ष प्रवेशाचे फटाके
कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांचा भाजपात प्रवेश
कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा धडाका लावलेला असताना आज कळसुलीचे माजी सरपंच अतुल दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. अतुल दळवी यांचा पक्ष प्रवेश हा कळसुली विभागात राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मानला जात आहे.
कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांचे आमदार नितेश राणे यांनी ओम गणेश निवासस्थानी पक्षात स्वागत केले. अतुल दळवी यांच्या समवेत माजी तंटामुक्ती अध्यक्ष नारायण दळवी, दिगंबर सुतार, पांडुरंग गुरव, शांताराम नाईक, मंगेश दळवी यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव येथील भाजपा पदाधिकारी भाई मोरोजकर आदी उपस्थित होते. अतुल दळवी यांच्या भाजपा प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची कळसुली विभागात असलेली ताकद अधिक वाढली आहे. आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.