आमदार नितेश राणेंमुळे ठाकर समाजाला मिळाला न्याय !
अधिकाऱ्याला “राणे स्टाईल” दाखवताच ठाकर समाज बांधवांना काही तासांतच मिळाले जातवैधता प्रमाणपत्र
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ठाणे उपायुक्त यांच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केल्यानंतर आ. राणे यांनी संबंधित अधिकाऱ्याला फैलावर घेताच हा प्रश्न तात्काळ निकाली लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाच्या शिष्टमंडळाने आज सकाळी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी जात पडताळणी उपायुक्त श्री. पावरा हे जात वैधता प्रमाणपत्र देत नसून कोर्टात धाव घेतल्यावर तेच जात वैधता प्रमाणपत्र मिळत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत सकाळीच आमदार नितेश राणे यांनी जात पडताळणी उपायुक्त पावरा यांची झडती घेत त्यांना खडेबोल सुनावले होते. या प्रकरणांमध्ये मी स्वतःहून लक्ष घालणार अशा प्रकारची ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजातील समाज बांधवांना दिली होती. या घटनेनंतर लगेचच अवघ्या काही तासांमध्ये दीपेश दीपक सिंगनाथ आणि दीप्ती दीपक सिंगनाथ यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असून आमदार नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजामध्ये आनंदाचं वातावरण असून सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्गच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे आभार मानले जात आहेत.