मालवण पं. स. च्या माजी उपसभापती चित्रा दळवी यांचे निधन

मालवण : मालवण पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. चित्रा चारुहास दळवी (वय ५० रा. तळगाव) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१२ ते २०१७ या कालावधीत त्या पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यरत होत्या. या दरम्यान एक वर्ष उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे. तळगाव मधील राणे समर्थक जेष्ठ कार्यकर्ते चारुहास दळवी यांच्या त्या पत्नी होत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!