मंदिराची दान पेटी फोडणाऱ्या चोरट्याला सतर्क नागरिकांनी घेतलं ताब्यात

कणकवलीतील घटना ; आणखी दोन ठिकाणी फंडपेट्या फोडल्याची माहिती ; चोरटा पोलिसांच्या स्वाधीन

कणकवली : कणकवली शहरात मंदिराची फंडपेटी चोरट्याला सतर्क नागरिकांनी ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या चोरट्याने आणखी दोन मंदिरात फंडपेटी फोडल्याची माहिती समोर आली आहे. या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

शहरात सकाळी ६ वा. च्या सुमारास भालचंद्र महाराज संस्थानकडील बालगोपाळ हनुमान मंदिर मधील दानपेटी फोडून रक्कम लंपास करणाऱ्या एका चोरट्याला कणकवलीतील सतर्क नागरिकांनी रंगेहाथ पकडले. बालगोपाळ हनुमान मंदिरची दान पेटी फोडत असताना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर, अनिल आणावकर यांच्यासह तेथील काहींनी या चोरट्याला पाहिले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या खिशात अजून दोन पेट्या फोडलेली रक्कम व पान पट्ट्यांमधील गुटखा, पान मसाला अशा देखील वस्तू आढळून आल्या. याबाबत चोरट्याकडे नागरिकांनी चौकशी केली असता नागवे रोडवरील राम मंदिर मधील दानपेटी फोडल्याचे सांगितले. या चोरट्यासोबत अजून एक तरुण होता. मात्र, नागरिकांची जाग मिळताच त्याने पलायन केले. दरम्यान पोलिसांकडून आता या चोरट्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कणकवलीतील नागरिकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!