युवकांना मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर ; गरज असेल तेव्हा हक्काने हाक मारा…

युवा नेते विशाल परब यांची साद ; तळवडे येथील म्हाळाईदेवी कला क्रीडा मंडळ आयोजित डबलबारी भजनाच्या सामन्याचे उदघाटन

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

विशाल परब हा सर्वसामान्य घरातून मोठा झालेला एक व्यक्ती आहे. तळवडे गावातील विशाल परब आज वयाच्या ३४ व्या वर्षी उद्योजक म्हणून राज्यात, देशात जाऊ शकतो. तर तळवडे गावातील आणखी एखादा युवक का जाऊ शकत नाही, असा सवाल भाजपचे युवा नेते, उद्योजक विशाल परब यांनी तळवडे येथे बोलताना व्यक्त केला. २००५ मध्ये आम्ही स्थापन केलेल्या विशाल परब मित्रमंडळाचं आज राज्य आणि देशाच्या स्तरावर विशाल सेवा फाउंडेशनमध्ये रूपांतरण झालं आहे. देशातील नामांकित कंपन्या आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. याद्वारे ठिकठिकाणी सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात युवकांच्या उत्कर्षासाठी, गावच्या विकासासाठी कधीही हाक मारा, अशी साद विशाल परब यांनी घातली.

तळवडे येथील म्हाळाई देवी कला क्रीडा मंडळ तळवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डबल बारी भजनाच्या जंगी सामान्याचे उदघाटन भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार देखील संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंझ्युमर सोसायटी चेअरमन प्रमोद गावडे, उद्योजक राजाराम गावडे, दादा परब, मंगदास पेडणेकर, सुरेश गावडे, स्नेहल राऊळ, ओंकार पावसकर यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विशाल परब म्हणाले, मेहनत, जिद्द याच्या बळावर येथील तरुणांनी देखील सामाजिक, राजकीय जीवनात नाव कमवावे, त्यासाठी जेथे माझी मदत लागेल, तेव्हा मी हजर असेन, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!