कणकवलीत सा. बां. उपअभियंत्याचे आकस्मिक निधन

कणकवली : कणकवली येथील सा. बा. विभागाचे उपअभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे (वय- ४५) यांचे सोमवारी रात्री आकस्मिक निधन झाले. आपल्या कार्यतत्परतेमुळे वर्षभरातच त्यांचे अनेकांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेले काही महिने गणेश कर्वे यांना पोटविकाराचा त्रास होता व त्यावर उपचारही सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले. मूळ फलटण येथील असलेले कर्वे हे गेल्या काही वर्षांपासून सातारा येथे स्थायिक झाले होते. वर्षभरापूर्वी कणकवलीचे उपअभियंता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत अनेक कामे मार्गी लावली होती. त्यामुळे अल्पावधीतच तालुक्यात त्यांचे नाव झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सातारा येथे रवाना झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!