संग्राम प्रभुगांवकर यांची शिवसेना ठाकरे गटाच्या कुडाळ – मालवण विधानसभा अध्यक्षपदी निवड

मालवण तालुका कार्यालयात पदाधिकारी, शिवसैनिकांच्या उपस्थितीत सत्कार

मालवण | कुणाल मांजरेकर

मसुरे गावचे सुपुत्र, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कुडाळ-मालवण विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने मालवण तालुक्याच्या वतीने येथील तालुका कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाळा महाभोज, विभाग प्रमुख विजय पालव, प्रविण लुडबे, समीर लब्दे, अण्णा गुराम, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सेजल परब, महिला तालुका संघटक दिपा शिंदे, तालुका समन्वयक पुनम चव्हाण, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, सुरेश मडये, यशवंत गावकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3530

Leave a Reply

error: Content is protected !!