कणकवलीत गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह

पोलिस घटनास्थळी दाखल ; मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु

कणकवली : कणकवली शहरालगत मराठा मंडळ नजीक असलेल्या केटी बंधाऱ्या नजिक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात सोमवारी सकाळी आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस चंद्रकांत माने, मंगेश बावधने, यांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. साधारणतः ४५ ते ५० वर्षीय असलेली ही व्यक्ती गुडघाभर पाण्यामध्ये बुडलेल्या स्थितीत काहींना आढळून आली. त्यानंतर पोलिसांना माहिती देताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. राखाडी कलरची ट्रॅक पॅन्ट व मरून कलरचा फुल हाताचा शर्ट असा त्या व्यक्तीचा पेहराव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्या व्यक्तीचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढला असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!