“माझी रांगोळी माझा सेल्फी”, दिवाळी निमित्त मालवणात ठिपक्याची रांगोळी स्पर्धा
मालवण शहर महिला काँग्रेस, मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहर महिला काँग्रेस व मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीचे औचित्य साधून मालवण तालुका आणि शहरातील महिला – मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ” माझी रांगोळी, माझा सेल्फी” ही ठिपक्यांची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत मुलींनी अथवा महिलांनी स्वतः काढलेल्या ठिपक्यांच्या रांगोळीचा एक फोटो, त्यात रंग भरलेल्या रांगोळीचा एक फोटो व पूर्ण झालेल्या रांगोळी सोबत एक स्वतःचा सेल्फी फोटो असे तीन फोटो ज्यात रांगोळी स्पष्टपणे दिसेल, ते सोबत स्वतःचे पूर्ण नाव आणि पत्त्यासह व्हॉट्सअप वर पाठवायचे आहेत. आलेल्या सेल्फी फोटो मधून परीक्षकांच्या मार्गदर्शना खाली विजेत्यांची निवड होणार असून शक्य झाल्यास त्या ठिकाणी येऊन परीक्षण देखील केलं जाणार आहे. यात प्रथम विजेत्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ११००/-, ९००/-, ६००/- रुपये तर उत्तेजनार्थ पाच क्रमांकांना ३००/- रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पल्लवी दर्शन खानोलकर- तारी 90110 56317, गीता गणपत नेवाळे – 94238 37857, विद्या फेलीस फर्नांडिस – 7767053364, सारिका हेमंत तळवडेकर – 94058 10199, स्नेहल राजेश मेथर – 9702604720 या क्रमांकांना फोटो व्हॉट्सअप करावे. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवणचे अध्यक्ष अरविंद मोंडकर 09892055820 यांच्याशी संपर्क साधावा. ही स्पर्धा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी व कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफ्रिन करोळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात येत आहे, अशी माहिती अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.