मालवण शहर महिला काँग्रेसच्या वतीने आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार

मालवण : कोल्हापूर उत्तर येथील विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा मालवण शहर महिला काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर येथे श्रीमती जाधव यांच्या प्रचारात मालवण मधील काँग्रेसचे काही पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या सोबत प्रचारात सहभागी झाले होते. या विजया नंतर मालवण तालुका काँग्रेसच्या वतीने शहरात फटाके वाजवून पेढे वाटत आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आला होता. कोल्हापूर येथील माजी पंचायत समिती सदस्य अरुणीमा सुनील माने यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अरविंद मोंडकर व महिला काँग्रेस पदाधिकारी गेले असता त्या ठिकाणी आमदार जयश्री जाधव यांची देखील भेट झाली. या दरम्यान आमदार महोदयां सोबत झालेल्या चर्चेत आमदार जयश्री जाधव यांनी आपण लवकरच मालवणला येऊ असे सांगितले. यावेळी अरविंद मोंडकर, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष गीता नेवाळे, ऍड.अमृता मोंडकर, युवक काँग्रेसचे योगेश्वर कुर्ले, विद्या फर्नांडिस, साक्षी नेवाळे उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!