मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : राजकीय पक्षांसमोर कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलचे आव्हान
परिवर्तन पॅनलमुळे निवडणुकीत रंगत ; व्यक्ती मतदार संघातून ९ उमेदवार रिंगणात
मालवण : मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलने उडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणूक रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांच्या पॅनल समोर आव्हान उभे राहिले आहे. या पॅनलने व्यक्ती सदस्य मतदार संघातून ९ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहे. या निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलने व्यक्त केला आहे.
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलने निवडणुकीत उडी घेतली आहे. व्यक्ती सदस्य मतदार संघातून ९ उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये ज्ञानदेव दत्ताराम ढोलम, राजन धोंडी भोजणे, गोविंद (अमित) बाळकृष्ण गावडे, कृष्णा हरिश्चंद्र ढोलम, महेश लक्ष्मण गांवकर, मनाली महेश चव्हाण, संतोष शांताराम चव्हाण, मनवा महेश गांवकर, यशवंत विलास पराडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कै. सुनील मलये, अमित गावडे यांनी खरेदी विक्री संघाच्या कारभारावर आणि संघाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर वेळोवेळी आवाज उठवला होता. कर्मचाऱ्यांच्या वेतना बाबत कोर्टात न्यायालयीन लढा लढत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्यामुळे सुनील मलये यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार असून या निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास कै. सुनील मलये परिवर्तन पॅनलने व्यक्त केला आहे.