सिंधुदुर्ग पोलीस दलात मोठे फेरबदल ; २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या !
पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आदींचा समावेश
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यातील २९ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या असून यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक पोलीस ठाण्यात आता नवीन अधिकारी दिसणार आहेत.
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये महिला पोलीस निरीक्षक रिजवान गुलाब नदाफ दोडामार्ग पोलीस ठाणे,
कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी बदली झाली आहे. तर कुडाळच्या पोलीस निरीक्षक पदी जिल्हा नियंत्रण कक्षातील व सध्या देवगड येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक फुलचंद्र भगवानराव मेंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले व सध्या सावंतवाडी येथे पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सांभाळणारे सचिन आनंदराव हुंदळेकर यांची कणकवली पोलिस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. तर जिल्हा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले निळकंठ गोपाळकृष्ण बगळे यांची देवगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांची मानव संसाधन शाखेत बदली झाली आहे. तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक आणि सध्या कणकवली पोलिस ठाण्यात तात्पुरती नेमणुकीस असलेले पोलीस निरीक्षक विजय यादव यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग मध्ये बदली झाली आहे. बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांची जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग येथे बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले व तात्पुरते ओरोस पोलीस ठाण्यात असलेले पोलीस निरीक्षक अमित यादव यांची जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग मध्ये बदली झाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची आचरा पोलीस ठाण्यातून बांदा येथे, गोविंद वारंग यांची नियंत्रण कक्षातून निवती, कुलदीप पाटील दोडामार्ग वरून आचरा, महेंद्र घाग दोडामार्ग वरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नियंत्रण कक्षातील व सध्या सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुप्रिया बंगडे यांना सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे देण्यात आले आहे. मनोज पाटील जिल्हा नियंत्रण कक्षातून कुडाळ पोलीस ठाणे कुडाळ येथे, तात्पुरते कार्यरत असलेले नियंत्रण कक्षातील शेखर शिंदे यांची कणकवली येथे बदली झाली आहे. संतोष वालावलकर यांना सावंतवाडी उपविभागीय पोलीस कार्यालयात बदली देण्यात आली आहे. मनीष कोल्हटकर यांना जिल्हा वाचक शाखेत नियुक्ती दिली आहे. राजाराम हुलावळे यांना कुडाळवरून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक शरद देठे कणकवली पोलिस ठाण्यात, शेखर सावंत देवगड, रवींद्र शेगडे यांची कणकवली पोलिस उप विभागीय वाचक शाखेत बदली झाली आहे. शाहू देसाई यांची स्थानिक गुन्हा शाखेतून आर्थिक गुन्हा शाखेत बदली करण्यात आली आहे. सुरेश पाटील यांची कणकवली मधून वैभववाडी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र नरोटे यांची नियंत्रण कक्षातून कोर्ट मध्ये बदली झाली आहे. प्रताप नाईक यांची जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग, दिलीप धुरी यांची अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या वाचक शाखेत बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांना कणकवली पोलिस ठाण्यातून मूळ नियंत्रण कक्षात बदली, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांची आचऱ्यावरून मालवण पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांची मालवणवरून कुडाळमध्ये बदली करण्यात आली आहे.