महाआवास अभियानात “सिंधुदुर्ग” ची उत्तुंग भरारी !

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विभागात तिसरी ; तर कुडाळ, वैभववाडी पं. स. चे नेत्रदीपक यश

ग्रा. पं. पुरस्कारात वाडोस, आखवणे भोम, सडूरे शिरोळे, अणाव, मांगवली ग्रामपंचायतींचे यश

प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत स्पर्धेत मुणगेच्या सखुबाई निकम प्रथम

3 सप्टेंबर रोजी कोकण भवन, नवी मुंबई येथे पुरस्कार वितरण

नवी मुंबई (प्रतिनिधी)

“महा आवास अभियान-ग्रामीण” अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मुल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या कोकण विभागातील संस्था व व्यक्तींना “महा आवास अभियान-ग्रामीण ‘ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याने या स्पर्धेत उज्ज्वल यश मिळवलं आहे. हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा. विभागीय महसूल आयुक्त विलास पाटील यांच्याहस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, येथे आयोजित करण्यात आला आहे.
सन 2021-21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जुन, 2021 या कालावधीत “महा आवास अभियान ग्रामीण ” राबविण्यात आले. “सर्वांसाठी घरे-2022″ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. हे अभियान कोकण विभागामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले.


या अभियानांतर्गत शासनाने विभागस्तरीय समितीचे गठन केले होते. या समितीचे विभागीय आयुक्त हे अध्यक्ष असून अपर आयुक्त, आदिवासी विकास, अपर कामगार आयुक्त/कामगार उपायुक्त, विभागीय उप आयुक्त, समाजकल्याण, उप आयुक्त (महसूल), उप आयुक्त (पुरवठा), बँक क्षेत्रिय अधिकारी हे सर्व सदस्य आहेत. तर उप आयुक्त (विकास) हे सदस्य सचिव आहेत. या समिती मार्फत उत्कृष्ट कामगिरीच्या विभागस्तरीय पुरस्कारांची निवड प्राप्त नामांकनामधुन विभागस्तरीय अंमलबजावणी, सनियंत्रण व मुल्यमापन करण्यात आले आहे.


कोकण विभागातील सर्व जिल्हा परिषदांकडून प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त माहितीनुसार व शासनाने गठीत केलेल्या विभागस्तरीय समितीच्या निकषानुसार गुण विचारात घेता उच्चतम गुणवत्ता पंचायत राज संस्था पुढीलप्रमाणे आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद रायगड. सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती म्हसळा, जि.प.रायगड, द्वितीय क्रमांक-पंचायत समिती दापोली, जि.प.रत्नागिरी, तृतीय क्रमांक-पंचायत समिती कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग. सवोत्कृष्ट ग्रामपंचायत-प्रथम क्रमांक- ग्रामपंचायत वाडोस, ता.कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक-ग्रामपंचायत आखवणे भोम, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत सडुरे शिराळे, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग,
सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था प्रथम क्रमांक- उमेद- ता. जव्हार, जि.पालघर द्वितीय क्रमांक- उमेद- ता.वाडा, जि.पालघर तृतीय क्रमांक- उमेद- ता. डहाणू, जि.पालघर शासकिय जागा उपलब्धता-प्रथम क्रमांक-तहसिलदार, ता.कल्याण,जि.ठाणे द्वितीय क्रमांक- तहसिलदार, ता.शहापूर, जि.ठाणे तृतीय क्रमांक-निरंक.
राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद-प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरी, द्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे. सर्वोत्कृष्ट पंचायत समिती- प्रथम क्रमांक-पंचायत समिती मोखाडा, जि.प.पालघर द्वितीय क्रमांक-पंचायत समिती तलासरी, जि.प.पालघर तृतीय क्रमांक- पंचायत समिती वैभववाडी जि.प.सिंधुदुर्ग.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत अणाव, ता.कुडाळ, जि.प.सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक- ग्रामपंचायत मांगवली, ता.वैभववाडी, जि.प.सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत उमरोली, ता.मंडणगड, जि.प.रत्नागिरी.
सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्था-प्रथम क्रमांक- उमेद- ता. जव्हार, जि.पालघर द्वितीय क्रमांक-उमेद-ता.वाडा, जि.पालघर तृतीय क्रमांक- उमेद-ता.डहाणू, जि.पालघर यांना देण्यात आले आहेत.

कोकण विभागातील सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल पुढीलप्रमाणे आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत-प्रथम क्रमांक- ग्रामपंचायत चिंचवली, ता.भिवंडी, जि.प.ठाणे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट गृहसंकुल प्रथम क्रमांक- श्रीम.सखुबाई दाजीबा निकम, ग्रा.पं. मुणगे, ता.देवगड, जि.प.सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहेत.
अभियानातील कार्पोरेट संस्थासाठी देण्यात येणारा सर्व उत्कृष्ट जिल्हा पालघर रोटरी डिस्ट्रीक्ट 3141 “अशियाना” ता.वाडा जि.पालघर यांना घोषित करण्यात येणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!