गद्दारांनी चिन्ह गोठवलं, शिवसैनिकांचं रक्त पेटवलं !

मालवणात शिवसैनिक आक्रमक ; मशालीने प्रतिकात्मक खोकासूराचे दहन

मालवण | कुणाल मांजरेकर

“गद्दारांनी चिन्ह गोठवलं, शिवसैनिकांचं रक्त पेटवलं”, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो”, “शिवसेना जिंदाबाद”, अशा घोषणा देत मालवण शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी मंगळवारी नवीन पक्ष चिन्ह असलेल्या मशालीने प्रतिकात्मक खोकासुराचे दहन केले. यावेळी धनुष्यबाण गोठवणाऱ्या शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, नंदू गवंडी, अमेय देसाई, उमेश मांजरेकर, नरेश हुले, सन्मेष परब, दीपक देसाई, प्रसाद आडवलकर, महेंद्र म्हाडगूत, बंड्या सरमळकर, गौरव वेर्लेकर, सिद्धेश मांजरेकर, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!