महेश कांदळगावकर अखेर शिवसेनेत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापासून अलीकडील काही महिने अलिप्त असलेल्या मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सपत्नीक राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे येथील संकल्प नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यक्रमात त्यांनी प्रवेश केला. मालवण शहरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपण ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

मालवण नगरपालिकेच्या २०१६ साली झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत महेश कांदळगावकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विजय मिळवला होता. गेले वर्षभर ठाकरे शिवसेनेतील नाराजीमुळे संघटनेपासून ते अलिप्त होते. आज ठाणे येथील शिंदे शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होत असलेल्या संकल्प नवरात्रौत्सव मंडळाच्या कार्यक्रमात महेश कांदळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभारी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सिंधुदुर्ग निरीक्षक दीपक वेतकर, नम्रता फाटक, सौ. स्मृती कांदळगांवकर यांसह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!