मालवण ग्रामीण रुग्णालयात उद्या स्वाथ्य अभियान ; विविध प्रकारच्या मोफत तपासण्या व मार्गदर्शन

सकाळी १० ते दुपारी ४ वा. पर्यंत आयोजन ; जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा – डॉ. अहमद

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वा. या वेळेत स्वास्थ्य अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध तपासण्या करून सल्ला दिला जाणार आहे.

या शिबिरात औषध (Medicine), शस्त्रक्रिया (Surgery), डोळ्यांचे वैद्यकीय (Ophthalmology), त्वचारोग (Skin), कान-नाक-गळा (ENT), दंत (Dental) आदींचे तज्ञ उपलब्ध असणार आहेत. तसेच यावेळी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदाब, शुगर, आणि इतर तपासण्या होणार असून तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी आरोग्यविषयक मार्गदर्शन व कार्यशाळा होणार असून याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी 8788064594 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. अहमद यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!