शिवसेनेची वचनपूर्ती ; मसुरे तळाणीवाडी स्मशानशेडच्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून ५ लाखांचा निधी
विधानसभाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर यांच्या पाठपुराव्याने ना. दीपक केसरकर यांच्याकडून निधी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील मसुरे तळाणीवाडी येथील शिवसेना शाखाप्रमुख शैलेश आंगणे आणि ग्रामपंचायत सदस्या रिया आंगणे तसेच ग्रामस्थांना दिलेल्या वचनानुसार येथील स्मशानभूमी शेडसाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे आणि तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधुन पाच लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले.
या भुमीपुजन सोहळ्याला बबन शिंदे, राजा गावकर यांच्यासह तालुका संघटक प्रितम गावडे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहरप्रमुख बाळकृष्ण नाटेकर, महिला आघाडी उपजिल्हा संघटक निलम शिंदे, उपतालुका संघटक प्रियांका मेस्त्री, उपतालुका संघटक प्रियांका कुमावत, उपशहर संघटक योगीता साळुंखे, अभिषेक डिचोलकर तसेच ग्रामस्थ प्रदीप सिताराम आंगणे, मनीषा प्रदीप आंगणे, मनोहर महादेव आंगणे, आशालता मनोहर आंगणे, अशोक गंगाराम आंगणे, विनायक मनोहर आंगणे, दिपक सहदेव आंगणे, सानीका दिपक आंगणे, दिपीका दिपक आंगणे, भाऊ राघो आंगणे, भुषण भाऊ आंगणे, वैशाली दिगंबर साळकर, नीलेश दिगंबर साळकर, रामदास धोंडु कावले, गिता रामदास कावले, आरती संतोष चव्हाण, पौर्णिमा चंद्रहास कांबळी उपस्थित होते.