लायन्स क्लब ऑफ मालवणकडून देऊळवाडा प्राथमिक शाळेला ब्लूटूथ स्पीकर प्रदान

मालवण : नवरात्र उत्सवातील श्री सरस्वती देवी पूजनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या वतीने प्राथमिक शाळा देऊळवाडा येथे आवश्यक असणारा ब्लूटुथ स्पीकर भेट देण्यात आला. शाळेत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमावेळी शाळेची गरज म्हणून ही भेट देण्यात आली. यावेळी शाळा प्रशासनाने लायन्स क्लब ऑफ मालवणचे आभार मानले.

यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष ला.महेश अंधारी, खजिनदार पल्लवी खानोलकर, जेष्ठ शिक्षिका आणि लायन्सच्या सदस्य ला. सौ. जयश्री हडकर, ला. मोहन पटेल, ला.मुकेश बावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्वेता यादव आदी सहकारी वर्ग , विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. यादव यांनी लायन्स क्लब सदस्यांचे स्वागत केले आणि लायन्स क्लबच्या कार्याची माहिती मुलांना आणि पालकांना दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3599

Leave a Reply

error: Content is protected !!