“काय झाडी… काय डोंगर फेम” आ. शहाजी बापू पाटील १५ ऑक्टोबरला प्रथमच कोकण दौऱ्यावर !
भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात उपस्थिती ; व्हिडीओ शेअर करीत दिली माहिती
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
“काय झाडी… काय डोंगर… काय हाटील” डायलॉगने देशात प्रसिद्ध झालेले शिंदे गटाची मुलुख मैदान तोफ, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे १५ ऑक्टोबरला प्रथमच कोकणच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजपचे युवा नेते, उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन गौरव सोहळ्याचे औचित्य साधून आ. पाटील कुडाळ मध्ये येत असून आ. पाटील यांनी व्हिडीओ शेअर करीत याबाबतची माहिती दिली आहे.
भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा १५ ऑक्टोबरला वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाला आमदार शहाजी पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शहाजी बापू पाटील हे पहिल्यांदाच कोकणात असून त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळणार आहे. शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीत गेल्यानंतर आपल्या डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली होती. त्यामुळे शहाजीबापू पाटील यांचा एक स्वतंत्र चाहता वर्ग संपूर्ण देशभरात निर्माण झाला आहे. शहाजी बापू पाटील हे प्रथमच कोकणात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाची कोकणवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. एका जिवलग मित्राच्या वाढदिवसाला हजर राहण्याची संधी मला मिळत असून कुडाळ ला आल्यानंतर सर्वच विषयावर भाष्य करण्याचे सूतोवाच आ. पाटील यांनी दिले आहे.