“बाळासाहेबांची शिवसेना” च्या वतीने मालवणात आकाश कंदील स्पर्धा

२१ ऑक्टोबर रोजी आयोजन : विजेत्यांना रोख रक्कमेसह आकर्षक पारितोषिके

ना. दीपक केसरकर, ना. उदय सामंत, भैय्या सामंत यांच्या पुढाकारातून आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने मालवण शहरातील भरड नाका येथे २१ ऑक्टोबर रोजी आकाशकंदील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बांबुच्या काठ्या, रंगीत कागद, साधा कागद याचा वापर करून बनविलेले आकाश कंदील स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. प्लास्टीकच्या कंदिलाला स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही. ही स्पर्धा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा शालेय गट आणि खुला गट अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. शालेय गटातील स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५००, १००० रूपये तर खुल्या गटातील स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रूपये व इतरही आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे बबन शिंदे, राजा गावकर, बाळू नाटेकर यांच्याकडे द्यावीत. अधिक माहितीसाठी ९३७०४२५९९० येथे संपर्क साधावा,

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!