रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या वीज ग्राहकांना दिलासा : वाढीव कंत्राटी कर्मचारी भरतीस मान्यता !

माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचा यशस्वी पाठपुरावा

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने अशोक सावंत यांचा विशेष सत्कार

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

कोकण परिमंडळाअंतर्गत रत्नागिरी व सिधूदुर्ग मंडल कार्यालयाकरिता बाह्यस्त्रोत तांत्रिक कंत्राटी कामगारांची संख्या 95% घेण्याकारिता मुख्य औद्योगिक संबंधित अधिकारी संजय ढोके यांनी मान्यता दिली आहे. यापूर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 85% कर्मचारी संख्या निश्चित करण्यात आली होती. मात्र या दोन्ही जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊन यापूर्वी असलेली 85% कामगाराची संख्या वाढवून 95 % करण्यात आली आहे. यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी यशस्वी पाठपुरावा केला.

वीज वितरण कंपनीने 10% जादा कर्मचारी घेण्याचे आदेश दिल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यां वरील ताण कमी होणार आहे. यापूर्वी कोकण परिमंडळ अंतर्गत तांत्रिक संवर्ग़ातील मोठया प्रमाणात रिक्त असलेल्या पदामुळे वीज पुरवठा सुरळीत आणि सुरक्षित ठेवणे, वाहिनीची दुरुस्ती करणे व वसुली उद्दिष्ट साध्य करणे आदी कामे विहित मूदतीत पार पाडणे शक्य होत नव्हते. यामुळे कंत्राटी कामगारांवर येणारा अतिरिक्त ताण कमी व्हावा, यासाठी सिंधूदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने जिल्हा अध्यक्ष अशोक सावंत यांनी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर केलेल्या पाठापूराव्यामुळे हे यश मिळाले आहे.

अशोक सावंत यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार

यापूर्वी कंत्राटी कामगारांचा गणेश चतुर्थीपूर्वी पगार झाला होता. त्यामुळे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कामगाराची चतुर्थी आनंदात साजरी झाली. त्यामुळे अशोक सावंत यांचा सावंतवाडी नगरपरिषद हॉलमधे उपस्थित सिंधूदुर्ग कामगाराच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधूदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश राऊळ, जिल्हा सरचिटणिस संदीप बांदेकर, कोषाध्यक्ष मोहन गावडे, वेंगुर्ला प्रतिनिधी योगराज यादव, सावंतवाड़ी प्रतिनिधी बापू देसाई , अमोल हुनुसवाडकर, दोडामार्ग प्रतिनिधी दर्शन देसाई, गणेश राऊळ, गणेश देसाई, जितेंद्र परब, सचिन नाईक, रामचंद्र राणे, जयेन्द्र कुंभार, रामा झोरे, प्रितेश हळदणकर, प्रकाश धुरी यांच्यासह सावंतवाडी मधील कामगार उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3840

Leave a Reply

error: Content is protected !!