ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक विजय कोळंबकर यांचे निधन

मालवण : कोळंब येथील ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक विजय गोपीनाथ कोळंबकर (वय 77) यांचे बुधवारी रात्री राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा कोळंब स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय कोळंबकर हे साईभक्त म्हणून प्रसिद्ध होते. कोळंब येथे त्यांनी सुरुवातीच्या काळात छोटेसे हॉटेल सुरु केले. त्यानंतर मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हॉटेलचा विस्तार वाढवला. अलीकडे काही दिवस ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. बुधवारी रात्री राहत्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोळंब येथील हॉटेल मालवणीचे मालक, युवा उद्योजक गणेश कोळंबकर यांचे ते वडील होत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!