“आरसेमहाल” च्या नूतनीकरणाला सुरुवात ; २.९७ कोटींचा निधी

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या वतीने निधी उपलब्ध

मालवण : मालवण येथील आरसेमहाल या शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या कामासाठी २.९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची आ. वैभव नाईक यांनी गुरुवारी पाहणी केली.

मालवणच्या सौदर्यात भर पाडणाऱ्या प्रसिद्ध आरसेमहाल , शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आल्याने त्या इमारतीचे नुतनीकरण करणे गरजेचे होते. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ही बाब विचारात घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मंजुरी साठी पाठपुरावा केला होता. आमदार वैभव नाईक यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आरसेमहाल, शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी बजेट मधून २ कोटी ९७ लाख रु.निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून गुरुवारपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी कामाच्या दर्जाबाबत ठेकेदाराला आवश्यक सूचना यावेळी त्यांनी केल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, सन्मेष परब, दीपक देसाई, महेश जावकर, किरण वाळके व ठेकेदार प्रतिनिधी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!