वेंगुर्ल्यातील चित्र प्रदर्शनाचे युवानेते विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

सेवा पंधरवड्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे वेंगुर्ल्यात प्रदर्शन

वेंगुर्ल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन वेंगुर्ले येथील नगरवाचनालय हॉल मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ भाजपाचे युवानेते विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर पर्यंत भाजपाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!