ना. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप
मालवण शहर भाजपचा उपक्रम
मालवण : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शहर भाजपच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या कन्याशाळे मधील आठवी व नववीतील विद्यार्थीना व फातिमा अनाथ आश्रम मधील सर्व विद्यार्थीनीना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा उद्योग व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, विलास हडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, प्रमोद करलकर, सौ.चारुशिला आचरेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण व भाजपा कार्यकते उपस्थित होते.