आचरा येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा १२९ ग्रामस्थांनी घेतला लाभ
भाजप नेते निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजन ; तज्ञ डॉक्टरांच्या टीम मार्फत विविध आजारांची तपासणी
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेला सेवा पंधरावडा व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंच्या संकल्पनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे मंगळवारी आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. १२९ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
भारतीय जनता पार्टी मालवण व श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, भ. क. ल वालावलकर रूग्णालय रोगनिदान व सेवाकेंद्र डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी उपसभापती राजु परुळेकर, माजी जि.प. सदस्य जेराँन फर्नांडीस, भाजप आचरा प्रभारी संतोष गांवकर, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, विजय निकम, चिंदर सरपंच राजश्री कोदे, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, चंदु सावंत, माजी आचरा सरपंच राजन गांवकर, अवधूत हळदणकर, विजय कदम, संजय लोके, हनुमंत प्रभू, प्रफुल्ल प्रभू, शेखर कांबळी, विश्वास गांवकर, सचिन हडकर, शशीकांत नाटेकर, मनोज हडकर, जॉमी ब्रिटो, हरीश गांवकर, एकनाथ पवार आदी उपस्थित होते. जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी ही शिबीरास भेट दिली.
शिबिरात आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. जाधव यांच्यासह डेरवण रूग्णालयातील डॉ. अभिजित भोसिकर-जनरल मेडिसिन, डॉ. रोहन नागटे-अस्थिरोग तज्ञ, डॉ. स्वप्निल निकम-शल्य चिकीत्सक, डॉ. विश्वंभर देवकर-स्री रोग तज्ञ, डॉ. प्रज्वल कटरे-नाक, कान, घसा, डॉ. अंकित बोराडे-नेत्ररोग तज्ञ यांनी तपासणी केली तसेच सोशल वर्कर सचिन धुमाळ यांचेही सहकार्य लाभले. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका, डॉक्टर यांचे यांनी विशेष परिश्रम घेतले. माजी खासदार निलेश राणे यांनी शिबिराला भेट दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेत रुग्णांची विचारपूसही केली.