आदित्य ठाकरेंची वचनपूर्ती : बीच क्लिनिंग मशीनचा उद्या मालवणात शुभारंभ

आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; समुद्र किनारे होणार साफ- मच्छीमारांनाही होणार लाभ

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकण किनारपट्टीवरील समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते. त्यामुळे येथील समुद्र किनारे स्वच्छ होण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गात बीच क्लिनिंग मशीन उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. त्याची पूर्तता झाली असून या बीच क्लिनिंग मशीनचा शुभारंभ रविवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे.

मच्छिमार्केटनजीकच्या समुद्र किनारी हा शुभारंभ होणार असून यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बीच क्लिनिंग मशीनमुळे पर्यटकां बरोबरच मच्छिमारांनाही फायदा होणार आहे, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!