भाजपची मागणी मान्य ; मालवणात नगरपालिका प्रशासनाने “ती” पत्र्याची शेड हटवली

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी मानले प्रशासनाचे आभार

मालवण : मालवण बाजारपेठ येथे भाजी मार्केट येथे पालिकेच्या वतीने इमारत उभारणी काम सुरू आहे. त्याच ठिकाणी जाण्या येण्याच्या मार्गावर बांधकाम सुरक्षेसाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्राची संरक्षण भिंत उभी केली होती. रस्त्यावर उभारण्यात आलेली पत्र्याची संरक्षक भिंत वाहतूकीला अडथळा ठरत होती. गणेशोत्सवात गर्दी कालावधीत ही बाब त्रासदायक ठरणार असल्याने भिंत तातडीने हटवण्यात यावी, अशी आग्रही व आक्रमक मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केल्यानंतर या मागणीची तात्काळ दखल घेत पालिका प्रशासनाने पत्र्याची भिंत हटवून मार्ग मोकळा केला आहे.

मुख्याधिकारी यांच्या भेटी दरम्यान माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, आबा हडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, नंदू देसाई, निनाद बादेकर, महेंद्र पारकर, राहुल हरजकर, उत्तम पेडणेकर, विद्या मेस्त्री, चंदू आचरेकर, आप्पा मोरजकर, नारायण लुडबे, तुळशीदास लुडबे, बाळू शिंदे, राजू बिडये आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. या शिष्टमंडळाच्या मागणीला यश आले आहे.माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पालिका प्रशासनाच्या तात्काळ कार्यवाही बाबत समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी संतोष जिरगे, अवेक्षक सुधाकर पाटकर, अधिकारी सोनाली हळदणकर यांचे आभार मानले आहेत.

बाजारपेठ येथील व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार भाजी मार्केट परिसरातील पत्र्याची भिंत तात्काळ हटवावी. जेणेकरून गणेश उत्सवात याठिकाणी गर्दी होणार नाही. सुलभपणे व्यापारी वर्गाला व्यवसाय करता येईल. त्या बरोबर येण्याजाण्याचा मार्गही सुलभ होईल. या मागणीची पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा केले. इमारत बांधकाम ठेकेदार यांचेही सहकार्य याकामी सहकार्य लाभले. असे आचरेकर यांनी सांगितले.या बरोबर शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडणे, सिमेंट काँक्रीटच्या निसरड्या रस्त्यावर ब्लिचिंग पावडर टाकणे, शहरात फवारणी करणे आदी कामे मागणी केल्यानुसार पालिका प्रशासनाने सुरू केली आहेत. ही कामेही लवकरात लवकर पूर्ण व्हावीत. यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार आहे, असेही सुदेश आचरेकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3603

Leave a Reply

error: Content is protected !!