मालवण पालिकेच्या व्यायामशाळेतील अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशीनरीचे लोकार्पण
आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती : आ. नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध २५ लाख निधीतून साहित्याचा पुरवठा
मालवण : मालवण नगरपालिकेच्या इमारतीतील व्यायामशाळेत आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायाम साहित्य व मशिनरीचे लोकार्पण मंगळवारी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. नाईक यांनी जिम मधील मशीनरीवर व्यायामाचे प्रात्यक्षिक केले.
आ. वैभव नाईक यांनी घेतलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेवेळी दर्जेदार जिम सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. आ. वैभव नाईक यांनी ती मागणी पूर्ण करुन आज प्रत्यक्षात जिम सुरू झाली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, जिम ही काळाची गरज झाली आहे. महेश कांदळगावकर यांच्यासह यतीन खोत, मंदार केणी व सहकारी नगरसेवक यांनी मालवणात चांगली जिम सुरु करण्याची मागणी माझ्याकडे केली होती. त्यानुसार शासन स्तरावर पाठपुरावा सुरु केला. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत २५ लाख निधी मंजूर करून अत्याधुनिक असे व्यायामशाळा साहित्य व मशीन्स उपलब्ध करण्यात आले आहेत. हे साहित्य व्यवस्थित हाताळून ते सुस्थितीत राखण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. जिममध्ये अन्य सुविधा देखील उभारण्यात येत आहेत. तरुणवर्गाने जिमच्या माध्यमातून करिअर करण्यावर भर द्या, असे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, किरण वाळके, बाबी जोगी, भाई कासवकर, महेश जावकर, संमेश परब, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, रुपेश सातार्डेकर, अन्वय प्रभू, अमेय देसाई, सेजल परब, दीपा शिंदे, सुनिता जाधव, शीला गिरकर, आकांक्षा शिरपुटे, दुर्गेश गावकर, गीतेश चव्हाण, गणेश सातार्डेकर, सौ. सामंत, सिद्धेश मांजरेकर, श्री. म्हाडगुत आदींसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवक वर्ग उपस्थित होता.